Fire breaks out at Delhi's Lajpat Nagar market, 16 fire tenders rushed to spot

दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील शोरूममध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील एका कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सेंट्रल मार्केटमधील केएफसीजवळ कपड्यांच्या शोरूममध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण आग पाहून आसपासच्या लोकांमध्ये […]

अधिक वाचा
A Level 2 Fire Broke Out In Mumbai's Oshiwara

मुंबईत ओशिवरा परिसरात रहिवाशी इमारतीला भीषण आग, मदत व बचावकार्य सुरु

मुंबई : मुंबईतील ओशिवरा येथील एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीला लागलेली आग लेव्हल-२ ची असल्याची माहिती मिळाली आहे. ओशिवरा परिसरात असलेल्या आशियाना या निवासी इमारतीत सकाळच्या सुमारास आग लागली आहे. ही आग कशी लागली, त्याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अग्निशमन […]

अधिक वाचा
15 junk godowns destroyed by massive fire in bhiwandi

भिवंडीत भंगार गोदामांना भीषण आग, 15 गोदामं जळून खाक

ठाणे : भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. या आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी […]

अधिक वाचा
Prime Criticare Hospital

पुन्हा अग्रितांडव! ठाण्यातील प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटला आग; चार रुग्णांचा मृत्यू

ठाणे: राज्य कोरोनाच्या संकटाशी झुंजत असतानाच दुसरीकडे रुग्णालयांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांचे प्रमाणही वाढले आहे. नागपूर, मुंबई, नाशिक येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनांच्या आठवणी विस्मृतीत जात नाही. मुंब्रा कौसा येथील प्राइम क्रिटीकेअर या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.  या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मिळालेल्या माहिती नुसार, […]

अधिक वाचा
A huge fire broke out in the head office of Punjab National Bank in kolkata

पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात भीषण आग

कोलकाता : कोलकाता शहरातील स्ट्रँड रोड वरील पंजाब नॅशनल बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या हेरिटेज बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत व बचावकार्य केले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बँकेची कॅन्टीन असलेल्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी आठच्या सुमारास पहिल्यांदा आग लागल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती […]

अधिक वाचा
A huge fire broke out in the ICU of the Cardiology Hospital in Kanpur

ब्रेकिंग : कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये भीषण आग

कानपूरमधील कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये रविवारी सकाळी भीषण आग लागली. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील आयसीयूमध्ये आग लागल्यानंतर सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या 50 जण रुग्णालयात अडकले असल्याची माहिती मिळत आहे. कार्डिओलॉजी हॉस्पिटलच्या इमारतीत आग लागल्यामुळे बेडसह रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या […]

अधिक वाचा
A huge fire broke out in Fashion Street in the camp area of Pune

पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग

पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या परिसरात मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे आग काही क्षणांत पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. फॅशन स्ट्रीट हे चहुबाजूनी गजबजलेले असून […]

अधिक वाचा
A fire broke out at a company in Sanaswadi MIDC area

ब्रेकिंग : सणसवाडी MIDC क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग

पुणे : सणसवाडी MIDC क्षेत्रातील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट दूरपर्यंत पाहायला मिळत आहेत. धुराचे लोट इतके जास्त आहेत की त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा निर्माण होत आहे. अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिरूर तालुक्यातील पुणे महामार्गालगत असलेल्या सणसवाडी औद्योगिक परिसरातील एका […]

अधिक वाचा
A huge fire broke out in a cylinder warehouse in Versova area

वर्सोवा परिसरात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, ४ जण जखमी

मुंबई : वर्सोवा परिसरातील यारी रोडजवळ भीषण आग लागली आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे येथील सिलेंडरच्या गोदामालाच आग लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लागलेली आग ही लेव्हल 2 ची असून यामध्ये आतापर्यंत 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सिलेंडरच्या गोदामालाच आग लागल्यानं परिसरात […]

अधिक वाचा
Fire engulfs Taloja MIDC, spreads to surrounding companies

ब्रेकिंग : तळोजा एमआयडीसीत आगीने घेतलं रौद्ररूप, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पसरली आग

मुंबई : नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीत भीषण आग लागली आहे. ह्या आगीची भीषणता वाढली असून बाजूच्या दोन कंपन्यादेखील या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत. आग रौद्ररूप घेत असून परिसरात घबराट पसरली आहे. सध्या अग्निशमन दलाची टीम आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत फार्मा कंपन्यांना लागणारं सॉल्व्हन्ट ऑइल तयार होत असल्याची माहिती आहे. […]

अधिक वाचा