नवी दिल्ली : 370 ही तात्पुरती कराराची बाब होती. तुम्ही आमच्याकडे 17 महिन्यांत काय केले याचा हिशोब मागता. पण तात्पुरतं असलेलं 370 कलम 70 वर्ष का चालू ठेवलं, याचं उत्तर कोण देईल? याआधी ७० वर्ष राज्य करण्याची संधी मिळालेल्यांनी ३७० तेव्हाच का हटवलं नाही त्याचे अगोदर उत्तर द्यावे. ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या सत्ता होती, त्यांनी स्वतःकडे बघून ठरवावं […]
टॅग: जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीर, पंजाब आणि नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये भूकंप
उत्तर भारतात शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बर्याच भागांमध्ये ६.१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजधानी नवी दिल्लीसह अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्राथमिक अहवालानुसार, पंजाबच्या अमृतसर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातीलही काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास […]
जम्मू – काश्मीरमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा सुरु, परंतु ‘या’ अटीसह मिळणार सुविधा
श्रीनगर : जम्मू – काश्मीरमध्ये तब्बल 18 महिन्यांनंतर 4G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. अनुच्छेद 370 हटवल्यानंतरपासूनच या भागात 4G इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ज्यानंतर आता ही सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तथापि, सरकारच्या आदेशात हे स्पष्ट करण्यात आले आहे कि, प्रीपेड सिमकार्डवर हाय स्पीड इंटरनेटची सुविधा नंबर व्हेरिफिकेशन नंतरच देण्यात […]
दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान घेत आहे नव्या मार्गांचा शोध
भारताविरूद्ध पाकिस्तानच्या कुरापती नेहमी सुरु असतात. दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब व्यतिरिक्त आता राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. BSF च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहे. आमचे […]
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानचे ११ जवान ठार
धनत्रयोदशीच्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही […]
दहशतवादी हल्ला : भाजपच्या ३ कार्यकर्त्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
जम्मू-काश्मीर : कुलगाम येथे दहशतवाद्यांनी तीन स्थानिक भाजप कार्यकर्त्यांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. या घटनेला कुलगाम पोलिसांनी दुजोरा देत माहिती दिली आहे की, पीडितांमध्ये फिदा हुसैन यातू, उमर रमजान हाजम आणि उमर राशिद बैग या तिघांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. त्यानंतर तेथून पसार […]
जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी
नवी दिल्लीः केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]







