cabinet meeting
महाराष्ट्र मुंबई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कुटुंबांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पीडित कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आज झालेल्या […]

Uddhav Thackeray, Eknath Shinde, and Sharad Pawar with Sanjay Raut in a political discussion about Maharashtra's Chief Minister issue
क्राईम देश राजकारण

देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका, संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप

जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]

6 ITBP Jawans Killed, 32 Injured As Bus Rolls Down The Road In Phalgam
देश

ब्रेकिंग! जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात, 6 ITBP जवान शहीद तर 32 जण जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात ITBP जवानांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 39 कर्मचारी घेऊन जाणारी सिव्हिल बस ब्रेक निकामी झाल्याने नदीच्या काठावर पडली. यात इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (इतबाप) चे 37 आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या 2 जणांचा समावेश आहे. या अपघातात तब्बल 6 ITBP जवानांचा मृत्यू झाला असून सुमारे 32 जण जखमी झाल्याची […]

‘Missing Report’ Filed Against Amit Shah
देश

जम्मू-काश्मीर टार्गेट किलिंग : दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश, ‘त्या’ चुकीची पुनरावृत्ती होणार नाही

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग थांबवण्यासाठी कठोर आणि अचूक पावले उचलली जातील. काश्मीर खोऱ्यातून हिंदूंना हाकलून दिले जाणार नाही. त्यांच्या सुरक्षेसाठी घाटीतच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यासाठी तयार करण्यात आलेल्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. टार्गेट किलिंगमध्ये सहभागी दहशतवादी आणि त्यांच्याशी संबंधित ओव्हर […]

देश

पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी एजन्सीज हाय अलर्टवर, कडक सुरक्षा व्यवस्था

जम्मू-काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांबा येथील पल्ली पंचायतीला भेट देण्याच्या एक दिवस आधी शनिवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. उल्लेखनीय आहे की येथे शुक्रवारी जैश-ए-मोहम्मदच्या दोन आत्मघाती हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली. जम्मूच्या बाहेरील सुंजवान लष्करी छावणीजवळ झालेल्या चकमकीनंतर केंद्रशासित प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या […]

jammu weaponised drones for terrorist india united nations concern
देश

संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने मांडला जम्मूमधील ड्रोन हल्ल्याचा मुद्दा

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील सैन्यतळावर ड्रोन हल्ला करण्याच्या कट रचल्याचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या सभेत उपस्थित करण्यात आला आहे. भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की रणनीतिक आणि व्यावसायिक मालमत्तांविरूद्ध दहशतवादी कारवायांसाठी सशस्त्र ड्रोन वापरण्याच्या शक्यतेकडे जागतिक समुदायाचे गंभीरतेने लक्ष देणे आवश्यक आहे. गृह मंत्रालयाचे विशेष सचिव (अंतर्गत सुरक्षा) व्ही.एस.के. कौमुदी म्हणाले की आज दहशतवादाचा प्रचार आणि […]

twitter website shows jammu kashmir and ladakh as separate country
देश

ट्विटरने पुन्हा केली भारताच्या नकाशासोबत छेडछाड

नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले […]

terrorists attacked joint team of police and crpf at naka in arampora sopore
देश

पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला, दोन पोलिस शहीद, २ नागरिकांचा मृत्यू

काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराला घेराव घालून व्यापक शोध मोहीम राबविली जात आहे. याआधी शुक्रवारी शोपियांमधील लिटर अग्लर भागात […]

BJP leader Rakesh Pandit
क्राईम देश

भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा […]

nikita vibhuti dhoundiyal joins indian army
देश

सलाम! शहीद मेजर विभूती धौंडियाल यांची पत्नी भारतीय सैन्यात दाखल, आजपासून ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितिका कौल आज भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहेत. नितीका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले […]