गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एका अविवाहित तरुणाला दारू पाजली आणि त्याची नसबंदी केली. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. गोविंद दंतानी नामक 30 वर्षीय तरुणाने आपबिती सांगितली. तो शेतात काम करत असताना एक आरोग्य कर्मचारी त्याच्याकडे आला. त्याने गोविंदला लिंबू आणि पेरू तोडण्यासाठी रोजंदारीवर […]
टॅग: गुजरात
‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, काही भागांत वादळी वारे वाहण्याचा अंदाज
मुंबई : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र झाल्यामुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह मराठवाड्यात पाऊस सुरूच असून आजही मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासह उत्तर कोकणात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत असल्याने मुंबईसह उपनगरात व अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे […]
गुजरातमध्ये लव्ह जिहाद कायदा होणार लागू, जाणून घ्या या कायद्यानुसार शिक्षेची तरतूद
गुजरात : गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी लव्ह जिहाद कायद्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार, जबरदस्तीने धर्मांतर करणार्यांवर आणि फसवणूक करुन विवाह करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 15 जूनपासून गुजरात राज्यात हा कायदा लागू होणार आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हा निर्णय घेतला आहे. लव्ह जिहाद विधेयक गुजरात विधानसभेत जोरदार गदारोळात पारित झाले. गुजरातचे राज्यपाल आचार्य […]
कोरोनाच्या लक्षणांकडे आईने केलं दुर्लक्ष, 14 दिवसांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
गुजरात : गुजरातच्या सूरत शहरात कोरोनाने अवघ्या 14 दिवसांच्या चिमुकलीचा बळी घेतल्याची दुःखद घटना घडली आहे. डॉक्टरांनी चिमुकलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर प्लाझ्मा थेरपीचा देखील वापर करण्यात आला. मात्र, चिमुकलीचा मृत्यू झाला. या बाळाला जन्मानंतर दोन दिवसात कोरोनाची लागण झाली होती. चिमुकलीच्या आईला आधीपासूनच कोरोनाची लक्षणे जाणवत होती. मात्र, तिने याकडे दुर्लक्ष केले. तिच्या या […]
महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार
जागतिक महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थान येथील अजमेरमध्ये गुजरातच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी तरुणीला JLN रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक […]
..म्हणूनच मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं, प्रकाश आंबेडकर यांची मोदींवर बोचरी टीका
गुजरातमधील मोटेरा स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आल्याने भाजपवर टीका होत आहे. या विषयावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका केली आहे. नरेंद्र मोदींचा लोकांवर विश्वास नाही, की मृत्यूनंतर कोणी आपल्याला लक्षात ठेवेल की नाही. म्हणून मृत्यूआधी स्टेडियम आपल्या नावे करुन घेतलं, असं प्रकाश आंबेडकर यांनी […]
ब्रेकिंग : मोटेरा स्टेडियमचे नाव झाले ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’, जाणून घ्या या स्टेडियमची खास वैशिष्ट्ये
अहमदाबाद : मोटेरा स्टेडियमचे नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आज अहमदाबादच्या या स्टेडियमवर खेळला जाईल. तत्पूर्वी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटन केले. उयावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित […]
दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान घेत आहे नव्या मार्गांचा शोध
भारताविरूद्ध पाकिस्तानच्या कुरापती नेहमी सुरु असतात. दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब व्यतिरिक्त आता राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. BSF च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहे. आमचे […]
अमूल घोटाळा : गुजरातचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक
गुजरातचा अमूल घोटाळा या दिवसात चर्चेत आहे. कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात पोलिसांनी काल दूध सागर डेअरीचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहमंत्री विपुल चौधरी यांना अटक केली. आर्थिक अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारदार भगवान भाई चौधरी यांनी मेहसाना पोलिस स्टेशनमध्ये विपुल चौधरी यांच्याविरुद्ध केला होता. गांधीनगर सीआयडी गुन्हेगारी शाखेच्या म्हणण्यानुसार दुध सागर डेअरीचे […]
जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता वर्ग; केंद्राकडून १६ राज्यांना 6000 कोटी रुपये जारी
नवी दिल्लीः केंद्र सरकारने जीएसटी भरपाईचा पहिला हप्ता म्हणून आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांना 6 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली. केंद्र सरकारने जीएसटी भरपाईबाबत गेल्या आठवड्यात विरोधी पक्षांनी केलेली मागणी मान्य केली. केंद्र सरकार आता स्वतः कर्ज घेऊन […]