Devendra Fadnavis
अमरावती महाराष्ट्र

जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चोवीस तासांत अहवाल सादर करा, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ […]

Successful kidney transplant by experts at Amravati Hospital without the help of Nagpur's medical team
अमरावती महाराष्ट्र

नागपूरच्या वैद्यकीय टीमची मदत न घेता अमरावतीच्या रुग्णालयात तज्ज्ञांकडून किडनी प्रत्यारोपण यशस्वी

अमरावती : अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात नागपूर येथील वैद्यकीय चमूची मदत न घेता स्थानिक तज्ज्ञांनी किडनी प्रत्यारोपण यशस्वी केले. या रुग्णालयाचे हे पंधरावे प्रत्यारोपण होते. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाना येथील श्रीमती किरण अशोक नंदागवळी या मातेने आपल्या मुलाला किडनी दान करून जीवनदान दिले. अत्यंत गरीब कुटुंबातील, वडिलांचे छत्र नसलेला सोमेश्वर अशोक नंदागवळी हा 24 […]

court order
अमरावती महाराष्ट्र

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, न्यायालयाने ठोठावली कठोर शिक्षा…

अमरावती : अमरावतीमध्ये बडनेरा येथील एका कंत्राटी टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली तरुणीशी अश्लील वर्तन केले होते. त्याने कोरोना चाचणी करण्यासाठी संबंधित तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा प्रकार समोर आला होता. या घृणास्पद घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती. या तरुणीचा स्वॅब घेतेवेळी तिच्याशी अश्लील कृत्य करणारा आरोपी अल्केश अशोकराव देशमुख (३२, रा. पुसदा) याला येथील जिल्हा […]

Body of a merchant Found In The Field in Amravati
अमरावती महाराष्ट्र

व्यापाऱ्याची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या

अमरावती : बिहारच्या एका व्यापाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिक गजानन साखरवाडे यांच्या शेतातील विहिरीच्या जवळ शेतमालकाला हा मृतदेह आढळून आला. २२ ऑगस्टच्या सायंकाळी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. राकेशकुमार रामदास पासवान रा. लालगंज, जिल्हा […]

What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]

The havoc of superstition! Aghori treatment on a three-year-old child from superstition
अमरावती महाराष्ट्र

अंधश्रद्धेचा कहर! तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके

अमरावती : भोंदूबाबाने तीन वर्षांच्या चिमुकल्याला उपचाराच्या नावाखाली विळ्याचे चटके दिल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात घडला आहे. या मुलाला ताप आल्यानंतर डॉक्टरांकडे नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेऊन अघोरी उपचार करण्यात आले. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेळघाटातील खटकाली गावात तीन वर्षाच्या चिमुकल्याला ताप आला त्यामुळे त्याला त्याच्या […]

selling an eight month old girl 4 arrested incident in virar
अमरावती क्राईम महाराष्ट्र

थरार : डोळ्यात मिरचीपूड फेकून १९ लाख ५० हजार रुपये लुटायला गेले आणि…

अमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका व्यक्तीकडील १९ लाख ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता. १९ मे रोजी सकाळी १०.30 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चौधरी (वय ३५) हे एका खाजगी कंपनीत मनी ट्रान्सफरचे […]

strict lockdown in kolhapur cancelled
अमरावती महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा, दुकानात जाण्यावर निर्बंध, ‘या’ सेवा मिळणार घरपोच

अमरावती : अमरावतीत कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. विदर्भातील विविध जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातूनही उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण अमरावती येथे येत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी कठोर पाऊल उचलले आहे. अमरावती जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ९ ते १५ मे दरम्यान कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल […]

A huge fire has been raging in the forest of Amravati forest department for the last three days
अमरावती महाराष्ट्र

अमरावती वनविभागाच्या जंगलात तीन दिवसांपासून भीषण आग, अग्निशमन दलाची गाडीही जळून खाक

अमरावती : तिवसा येथील सारसी सातरगाव रोड येथील वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून भीषण आगीचे तांडव सुरू आहे. आज ही आग नियंत्रणात आणण्यासाठी गेलेली तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची नवीन गाडी जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत नगरपंचायतीचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाडीला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे येथील अग्निशमन दलाची […]

Approval of various projects and funds in Amravati district by the Board of Regulators
महाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धासह विविध प्रकल्पाच्या कामांना व निधीला नियामक मंडळाची मान्यता

अमरावती : अमरावती जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी ऊर्ध्व वर्धा, निम्न पेढीसह विविध प्रकल्पाच्या प्रस्तावित कामे व निधीला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळाली असून त्यामुळे प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. पुनर्वसनाची कामेही गतीने पूर्ण होतील, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. गुरुकुंज मोझरी, पाथरगाव, सिंचन योजनेच्या […]