Eknath Khadse join NCP
महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचंही सांगितलं आहे. त्यातच आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे पण चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे अशी कोणती भूमिका घेणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगितलं की, “एकनाथ खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल”.

शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली का ? असं विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत