बिहारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. भाजपच्या रेणू देवी यांच्यासह तारकिशोर प्रसाद यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. तारकिशोर प्रसाद भाजप विधानसभेचे नेते म्हणून कटिहार मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर रेणू देवी चौथ्यांदा बेतियाह मधून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.
सुशील कुमार मोदी यांनी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांचे अभिनंदन केले. सुशील मोदी यांनी ट्वीट केले की, “तारकिशोरजी यांना एकमताने भाजपा विधिमंडळाचा नेता निवडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.”
तारकिशोरजी को भाजपा विधानमंडल का नेता सर्वसम्मति से चुने जाने पर कोटिशः बधाई !
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020
दुसऱ्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, “नोनिया समुदायातून आलेल्या बेतिया येथून चौथ्यांदा निवडून आलेल्या रेणू देवी यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या उपनेतेपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!”
नोनिया समाज से आने वाली बेतिया से चौथी बार विधायक श्रीमति रेणु देवी के भाजपा विधान मण्डल दल के उप नेता सर्वसम्मति से चुने जाने पर हार्दिक बधाई!
— Sushil Kumar Modi (@SushilModi) November 15, 2020




