देश

भाजपाकडूनच बॅन केलेल्या CamScanner या चिनी अ‍ॅपचा वापर

चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर या तणावाच्या वातावरणातच भारतानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकद चिनी अ‍ॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि याला कारणही भाजपाच ठरली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचं पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आलं. मात्र हे पत्र CamScanner या चिनी अ‍ॅपनं Scan केलेलं आहे. या पत्राच्या शेवटी तसा उल्लेखही दिसून येतो. ही चूक नेटकऱ्यांनी लक्षात आणूण देताच भाजपानं ट्विट डिलीट केलं. मात्र, तोपर्यंत CamScanner या चिनी अ‍ॅपनं Scan केलेलं हे पत्र सगळीकडे व्हायरल झालं होतं. सध्या ट्विटरवर भाजपाला यावरून ट्रोल केलं जात आहे.

एक नेटकऱ्यांनं असं म्हटलं आहे की, “CamScanner या चिनी अ‍ॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. पण सत्ताधारी पार्टीच त्याचा कार्यालयीन कामासाठी वापर करत आहे. त्यांनी हे अ‍ॅप काढून टाकलेलं नाही.” तर एकानं AdobeScan वापरण्याचा सल्ला दिला आहे.

या पत्रामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी भाजपावर निशाणा साधला असून, टीकेबरोबरच सल्लेही दिले जात आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत