vaccination campaign will start As soon as the experts get the green flag

तज्ज्ञांना हिरवा झेंडा मिळताच देशात लस अभियान होणार सुरु – पंतप्रधान मोदी

देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक सर्वपक्षीय बैठक घेतली. येत्या काही दिवसांत कोविड १९ लस तयार होऊ शकते. देशात जवळपास आठ लशींवर काम सुरू आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात लशींच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम सुरू आहे. सध्या देशात तीन वेगवेगळ्या लशींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोविड १९ लस वितरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावं लागणार आहे. यासाठी देशात कोल्ड चैनची व्यवस्था निर्माण करण्यावर आणखीन भर द्यावा लागणार आहे. लशी संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे तसंच सुचनाही विचारात घेण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय बनावटीची लस तयार करणाऱ्या तज्ज्ञांशीही चर्चा केली. आपले वैज्ञानिक करोना लशीसंदर्भात खूपच आश्वासक आहेत.

भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि ICMR जागतिक पातळीवर लस निर्मात्या कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही आठवड्यांत लस तयार होऊ शकेल. यानंतर, तज्ज्ञांना लशीसंदर्भात हिरवा झेंडा मिळताच देशात लस अभियानाला सुरुवात होईल. करोना लशीच्या वाटपासंदर्भात गाईडलाईन्स बनवण्याचं काम सुरू आहे. लस बनवण्याची भारताची क्षमता जगातील इतर देशांपेक्षा नक्कीच चांगली आहे. आपल्याकडे मोठं नेटवर्क आहे, याचाही फायदा घेता येईल, असं पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीत म्हटलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत