PITBULL ATTACKS, OLD WOMAN DIED IN BALRAMPUR HOSPITAL
देश

भयंकर! पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृत्यू, शरीरावर जखमांच्या अनेक गंभीर खुणा

लखनौ : घरातील पाळीव कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कैसरबागच्या बंगाली टोला येथे राहणाऱ्या सुशीला त्रिपाठी या मंगळवारी त्यांच्या पाळीव पिटबुलने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर नातेवाइकांनी त्यांना बलरामपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मंगळवारी सायंकाळी उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कैसरबागच्या बंगाली टोला येथे सुशीला त्रिपाठी कुटुंबासह राहतात. त्यांच्याशिवाय कुटुंबात त्यांच्या मुलांसह इतर अनेक लोक राहतात. घरात मोलकरीणही राहते. सुशीला यांचा मुलगा अमित त्रिपाठी अलीगंजमधील जिममध्ये ट्रेनर आहे. घरात दोन पाळीव कुत्रे आहेत. त्यातील एक लॅब्राडोर आहे आणि दुसरा भयानक पिटबुल प्रजातीचा आहे. मंगळवारी सकाळी मुलगा अमित जिमला गेला आणि सुशीला टेरेसवर कुत्र्यांना फिरवत होत्या. दरम्यान, अचानक पिटबुलने त्यांच्यावर हल्ला केला. पिटबुलने त्यांना चावण्यास सुरुवात केली. वृद्ध सुशीला जीव वाचवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडत होत्या, इकडे तिकडे धावत होत्या. पण त्या पिटबुलच्या तावडीतून सुटू शकल्या नाहीत. पिटबुलने त्यांच्या अंगावर अनेक ठिकाणी चावा घेतला. पिटबुलने त्यांच्या पोट, डोके, चेहरा, पाय आणि हातांमध्ये अनेक ठिकाणी दात रुतवून त्यांचे लचके तोडले, त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.

शरीरावर 13 मोठ्या जखमांच्या खुणा
सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला त्रिपाठी यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम काल सायंकाळी उशिरा करण्यात आले. शवविच्छेदनात त्यांच्या चेहऱ्यावर, पोटावर, डोक्याच्या मागच्या बाजूला, दोन्ही हात आणि मांडीवर अशा 13 ठिकाणी जखमांच्या गंभीर खुणा आढळल्या. बलरामपूर येथून त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये नेले असता त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह डोक्यावर व पोटावर पट्टीने झाकलेला होता. या 13 मोठ्या जखमांशिवाय शरीरावर अनेक ठिकाणी ओरखडेही आढळून आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत