Water To Be Released From Khadakwasla Dam
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून विसर्ग कमी करून केला 5564 क्युसेक, पावसाच्या प्रमाणानुसार पुढील निर्णय…

पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, खडकवासला धरण परिसरात मंगळवारच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करून सकाळी ११ वाजता ५५६४ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून या धरणातून मुठा नदीत १०,२४६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यानंतर धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्ग कमी करून सकाळी ११ वाजता ५५६४ क्युसेक करण्यात आला आहे.

सध्या चारही धरणांमधील पाणीसाठा १२.२३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४१.९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. मंगळवारी रात्री ते बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात 160 मिमी, वरसगाव धरण क्षेत्रात 88 मिमी, पानशेत धरण परिसरात 93 मिमी आणि खडकवासला धरण परिसरात 38 मिमी पावसाची नोंद झाली आहे. खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सध्या १२.२३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांमध्ये 11.57 टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी पाणीपुरवठ्यात 0.66 टीएमसीने वाढ झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

दरम्यान, खडकवासला धरण परिसरात मंगळवारच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने या धरणातून मुठा नदीत 13 हजार 142 क्युसेकने विसर्ग करणाऱ्या विसर्गाचा वेग बुधवारी सकाळी 2896 क्युसेकने कमी झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यानंतर 11 वाजल्यापासून हा विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत