चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी दोन दिवस लडाखचा दौरा केला त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की, ‘LAC वर स्थिती तणावपूर्ण आहे, मात्र आपलं सैन्य प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. मागील तीन महिन्यांपासून स्थिती तणावपूर्ण आहे मात्र आपल्या जवानाचं मनोबल उंचावलेलं आहे.’
गुरुवारी लष्करप्रमुखांनी काही फॉरवर्ड लोकेशन्सचा दौरा केला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुखांनी सैनिकांच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा देखील घेतला. लष्करप्रमुखांच्या दौऱ्याआधी बुधवारी वायुसेना प्रमुख आर के एस भदौरिया यांनी पूर्व लडाखचा दौरा केला होता. वायुसेना प्रमुखांनी चीनच्या सीमेला लागून असलेल्या सिक्किम, असम, अरुणाचल, मेघालयमध्ये वायुसेनेच्या कॉम्बॅट यूनिट्सच्या आपरेशनल तयारीचा आढावा घेतला होता.




