62 year old woman raped stabbed 25 times by man

धक्कादायक! जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर जेलमध्ये केला बलात्कार

क्राईम देश

राजस्थान : राजस्थानमधील जोधपूर कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तेथून पळ काढल्याची घटना घडली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जोधपूरच्या खुल्या कारागृहात (open-air jail) कैदेत होता अशी माहिती मिळाली आहे. या आरोपीवर खुनाचा आरोप असून तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. आरोपीने त्याच्या अल्पवयीन मुलीलाही सोबत ठेवले होते. त्याची पत्नीही काही काळ त्याच्यासोबत होती, पण नंतर ती त्याला सोडून गेली. त्यानंतर मुलीने वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, बुधवारी पीडितेने तिच्या आईला फोन करून तिच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण जोधपूर पोलिसांकडे पाठवण्यात आले आणि एफआयआर नोंदवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण मंदोर पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले असून आता तेथील पथकाने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आरोपी वडिलांविरुद्ध आयपीसी कलम आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र आता गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या पलायनामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारच्या खुल्या कारागृहाच्या संकल्पनेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. आरोपींसाठी खुला कारागृह सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक! गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला पंख्याला उलटं टांगून केली मारहाण

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत