नवी दिल्ली : महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. यादरम्यान, संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर नेत्यांमध्ये हरीश रावत, पी चिदंबरम, दीपेंद्र हुडा आदींचा समावेश होता.
दुसरीकडे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन स्तरांमध्ये बंदोबस्त लावला आहे. कोणत्याही कार्यकर्त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. दरम्यान, सोनिया, राहुल यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार काळे कपडे घालून सभागृहात आले आणि त्यांनी केंद्राच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. सकाळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, ‘तुम्ही हुकूमशाही करत आहात का, इथे रोज लोकशाहीची हत्या होत आहे. या सरकारने 8 वर्षांत लोकशाही उद्ध्वस्त केली. काँग्रेसकडून आज देशभरात केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत आहे.




