गुजरात : गुजरातच्या मोरबीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मच्छू नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज अचानक कोसळला. त्यामुळे अनेक जण नदीत पडले. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटना घडली त्यावेळी पुलावर मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पोलीस आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. स्थानिकदेखील सहकार्य करत आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विटरवर लिहिले की, “मोरबीमध्ये झुलता पूल कोसळण्याच्या दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. मदत आणि बचाव कार्य चालू आहे. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत मी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.




