तामिळनाडू : रविवारी ७ मुलींचा गेडिलाम नदीत बुडून मृत्यू झाला. यात 4 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. तामिळनाडूतील पाणरुट्टीजवळील किलारुंगुनम गावात ही घटना घडली. या मुली तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील नेल्लीकुप्पमजवळील कुचिपलायम येथील होत्या. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिकृत निवेदनात मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची एक्स-ग्रॅशिया जाहीर केली. ही रक्कम मुख्यमंत्री सार्वजनिक मदत निधीतून घेण्यात आली आहे.
अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले. जलकुंभांजवळ चेतावणी देणारे फलक लावले पाहिजेत, असे ते म्हणाले. संकटाच्या वेळी मदत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लोकांना, विशेषत: पाणवठ्याजवळ राहणाऱ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून शोक व्यक्त केला.
I’m saddened by the drowning of youngsters in Tamil Nadu’s Cuddalore. In this time of grief, my thoughts are with the bereaved families: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 6, 2022




