एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरू होते,’ असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. ‘वेलकम एकनाथ खडसे साहेब’ असं म्हणत त्यांनी खडसेंचं पक्षात स्वागत केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला ओहोटी लागली’, अशा बातम्या वर्षभरापूर्वी येत होत्या. पण निसर्गाचाच नियम आहे, ओहोटी संपल्यानंतर भरती सुरु होते.
WelCome
एकनाथ खडसे साहेब!@EknathGKhadse pic.twitter.com/IYjsVQ8ZMy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 21, 2020
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार व नेते पक्ष सोडून गेले. राष्ट्रवादी काँग्रेस संपली अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याला त्यावेळी या पक्षांतराबाबत प्रश्न विचारले जात होते. मात्र, शरद पवारांच्या झंझावातामुळं राष्ट्रवादी व काँग्रेसनं राज्यात सन्मानजनक जागा मिळवल्या आणि भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून रोखले. अखेर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना झाली. शरद पवार यांनी त्यासाठी स्वत: पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादीनं पुन्हा बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे.




