Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवार यांना धमकी, सुप्रिया सुळे यांची मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना व्हॉट्सऍपवर धमकी आली आहे. शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन याबाबत तक्रार केली. शरद पवार यांना धमक्या मिळाल्याची माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी एका वेबसाईटच्या माध्यमातून धमक्या दिल्याचं म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांना मिळालेल्या धमकीबाबत त्यांनी हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच हे राजकारण थांबायला हवे, असेदेखील म्हटले आहे. यावेळी पोलिसांकडून न्याय मागण्यासाठी मी येथे आले असल्याचे त्यांनी सांगितले.  माझ्या वडिलांना काही इजा झाली तर त्याला गृह मंत्रालय जबाबदार असेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे न्यायासाठी आवाहन केले, तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या गृहमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली.

शरद पवार यांच्याबाबत व्हॉट्सऍपवरवरील धमकीच्या संदेशात काय आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याबाबत सुप्रिया सुळे किंवा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यानंतर पवारांना मिळालेली धमकी राजकीय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत