The container crushed the traffic police on duty

संतापजनक : ड्युटी निभावत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातला कंटेनर

नाशिक महाराष्ट्र

नाशिक : नाशिक येथील पेठ रोडवर अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. ड्युटी निभावत असलेल्या वाहतूक पोलिसाला कंटेनरने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पोलिसाचे नाव कुमार गायकवाड असून ते हेड कॉन्स्टेबल होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड यांनी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने कंटेनर त्यांच्या अंगावर घातला. नाशिक ग्रामीण मधील वांगणीफाटा येथे नाकाबंदी दरम्यान ही दुर्घटना घडली. कंटेनरखाली सापडून वाहतूक पोलीस कुमार गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

दुपारी जिल्हा वाहतूक विभागाच्या एका पथकाने नाकाबंदी लावली होती. वांगणीफाट्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान, बडोद्याच्या दिशेने चाललेल्या कंटेनरला पोलीस पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वेगाने कंटेनर पोलिसांच्या दिशेने आणला. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून दूर उड्या मारल्या पण गायकवाड यांचा कंटेनर खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पेठ पोलिसांनी कंटेनर चालकास अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत