Sharad Pawar
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया…

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षालाही डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका ट्विटर हँडलवरून आणि फेसबुक पोस्टमधून शरद पवार यांना धमकी देत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. यातील फेसबुकवरील पोस्टमध्ये शरद पवार यांचं नाव घेत ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आलेली आहे. तसंच सौरभ पिंपळकर या नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या मजुकराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत