Police Detained Ketaki Chitale After Controversial Post On Sharad Pawar

केतकी चितळे न्यायालयात म्हणाली, मी ‘ती’ पोस्ट डिलीट करणार नाही…

ठाणे महाराष्ट्र

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळे हिला रविवारी सकाळी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी केतकी चितळे न्यायालयात म्हणाली की मी पोस्ट डिलीट करणार नाही. न्यायालयाने केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे सत्र न्यायालयाबाहेरही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतकी चितळे हिच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केतकी चितळे हिच्यावर राज्यात ९ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकी चितळेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

दरम्यान, केतकी चितळे हिने कोणताही वकील घेतला नव्हता. तिने न्यायालयात स्वत:च युक्तिवाद केला. यावेळी तिने आपण राजकीय व्यक्ती नसल्याचे सांगितले. मला समाज माध्यमांवर माझे स्वत:चे मत मांडायचा अधिकार नाही का, असा सवालही तिने विचारला. ती म्हणाली, “ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? मी पोस्ट डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, अशी ठाम भूमिकाही केतकीने घेतली आहे. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली. यानंतर केतकी चितळेचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ मे रोजी होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत