terrible tanker accident in dhule many injured

धक्कादायक घटना समोर, धुळ्यात मद्यपी टँकर चालकाचा धूडगूस; अनेक वाहनांना उडवलं, मोठं नुकसान

क्राईम धुळे महाराष्ट्र

धुळे : धुळे शहरात रात्री एका मद्यपी टॅंकर चालकाने चांगलाच धूडगूस घातला आहे. या टँकर चालकाने शहरातील अनेक वाहनांना उडवलं. या घटनेमध्ये अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या टँकर चालकाला वेळीच थांबवल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याचे नाव राजेंद्रसिंग सकट असल्याची माहिती समोर येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री एका मद्यपी टँकर चालकाने अनेक वाहनांना उडवले. ही घटना शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान घडली. राजेंद्रसिंग सकट असं या टँकरचालकाचं नाव आहे. राजेंद्रसिंग हा आपले टँकर घेऊन गुजरातकडे जात होता. मात्र तो दारूच्या नशेत असल्यानं त्याने धुळे शहरातील फाशीपूल ते संतोषी माता चौकादरम्यान अनेक वाहनांना उडवलं. या घटनेत काही वाहनचालक जखमी झाले आहेत. पोलिसांकडून या टँकरचालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

या टँकरचालकाला वेळीच रोखण्यात पोलिसांना यश आलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या टँकर चालकाने तोपर्यंत अनेक वाहनांना उडवले होते. या घटनेत अनेक वाहनचालक जखमी झाले आहेत. पोलिसांनी या टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत