sanjay raut
महाराष्ट्र मुंबई

संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी, न्यायालयाने सुनावली १५ दिवसांची कैद

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिवडीच्या शहर दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निकाल सुनावला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. २०२२ मध्ये शौचालय घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. संजय राऊत यांच्यावर आयपीसीच्या ४९९ कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.संजय राऊत कोर्टात हजर होणार असून १५ दिवसांची कैद असल्याने संजय राऊत जामिनास पात्र आहेत.

दरम्यान, न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्या मेधा सोमय्या यांनी निकालानंतर व्यक्त केली होती. माझ्या कुटुंबावर आरोप करत मुलांना टार्गेट केले होते. एक सामान्य शिक्षिका जशी लढेल तशी मी लढले. मी कोर्टाच्या निकालावर समाधानी आहे, असे मेधा सोमय्या म्हणाल्या.

शौचालय घोटाळा काय आहे?
मिरा भाईंदर शहरात एकूण १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. त्यातील १६ शौचालयं बांधण्याचं काँट्रॅक्ट भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करुन, मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केली, तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर संजय राऊत यांनी केला होता. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याची कारणं दाखवून शौचालय घोटाळा करण्यात आल्याचं संजय राऊत म्हणाले होते.

त्यानंतर मेधा सोमय्या यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत मुंबईतील शिवडी कोर्टात धाव घेतली होती. तसंच हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत