मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. राऊत यांना १५ दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. याशिवाय २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. शिवडीच्या शहर दंडाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निकाल सुनावला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती. […]

