While learning to drive, the car went out of control and fell into a well, 3 people including two brothers died
नागपूर महाराष्ट्र

ड्रायव्हिंग शिकताना कार पडली विहिरीत, दोन भावांसह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बालभारती मैदानाजवळ गाडी चालवायला शिकणाऱ्या तरुणाची गाडी विहिरीत पडली. ज्यामुळे कारमध्ये प्रवास करणाऱ्या दोन भावांसह तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारसह तरुणांचे मृतदेह बाहेर काढले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुटीबोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप भोसले म्हणाले की, ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. एका गाडीत तीन तरुण होते. ज्यामध्ये एक तरुण गाडी चालवायला शिकत होता. यादरम्यान अचानक गाडीचा वेग वाढला आणि गाडी नियंत्रणाबाहेर जाऊन शेताजवळील विहिरीत पडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर गाडी बाहेर काढण्यात आली. यासोबतच तरुणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले.

मृत तरुणांची नावे सूरज चव्हाण, साजन चव्हाण आणि संदीप चव्हाण अशी सांगण्यात येत आहेत. सूरज आणि साजन दोघेही सख्खे भाऊ आहेत. तर संदीप हा सूरजचा मित्र होता. सध्या पोलिस या प्रकरणाचा इतर बाजूंनीही तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत