Man Drowns
पुणे महाराष्ट्र

पुणे : बाप-लेकीचा भाटघर धरणात बुडून मृत्यू

पुणे : दोन पर्यटकांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये  पोहताना तेरा वर्षीय ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी आणि तिचे वडील शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) यांचा बुडून मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी शिरीष धर्माधिकारी आणि ऐश्वर्या कुटुंबातील इतर सदस्यांसह भोर तालुक्यातील पसुरे गावाजवळ पिकनिकसाठी आले असताना ही घटना घडली. हे पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरले होते. यादरम्यान, तेरा वर्षीय ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी आणि तिचे वडील शिरीष मनोहर धर्माधिकारी यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर, पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या बहुमोल सहकार्याने शोध मोहीम राबवण्यात आली. तेरा वर्षीय ऐश्वर्याचा मृतदेह कालच सापडला तर शिरीष धर्माधिकारी यांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह सापडला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत