Chief Minister's visit to the 'Spirit of India' exhibition organized on the occasion of Independence Day

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी भारतीय वन सेवेतील अधिकारी व चित्रकार प्रदीप वाहुळे यांच्या ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर या प्रदर्शनाला भेट दिली व चित्रकार वाहुळे यांचे कौतुक केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडत आहे. मंत्रालयातील आयोजनानंतर हे प्रदर्शन आता वरळीच्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथे २१ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत