Man Drowns
पुणे महाराष्ट्र

पुणे : बाप-लेकीचा भाटघर धरणात बुडून मृत्यू

पुणे : दोन पर्यटकांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये  पोहताना तेरा वर्षीय ऐश्वर्या शिरीष धर्माधिकारी आणि तिचे वडील शिरीष मनोहर धर्माधिकारी (वय ४५) यांचा बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी शिरीष धर्माधिकारी आणि ऐश्वर्या कुटुंबातील इतर सदस्यांसह भोर तालुक्यातील पसुरे गावाजवळ पिकनिकसाठी आले असताना ही घटना घडली. […]