strict action against those who transport and sell gutka
पुणे महाराष्ट्र

पुणे : 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) हडपसर पोलिसांच्या मदतीने एका ट्रकमधून हैदराबादहून मुंबईकडे नेला जाणारा 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वास डगळे यांनी  याबाबत माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे. हा ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. श्रीराम यादव (52) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याचे साथीदार सिडलेदत्त रेड्डी, विष्णू रेड्डी, सुशांत रे आणि दीपक कोठारी यांच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

बुधवार २९ जून रोजी गुटख्याने भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने निघाला होता. याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली, त्यानंतर त्यांनी हडपसर पोलिसांच्या मदतीने हा ट्रक हडपसर येथे अडवला. ट्रकमध्ये 40 पोत्यांमध्ये 52 लाख 18 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला, आणि पोलिसांनी तो जप्त केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत