court order
महाराष्ट्र मुंबई

शाळकरी मुलीचा पाठलाग करत ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई : पॉक्सो कायद्यांतर्गत नियुक्त विशेष न्यायालयाने एका शाळकरी मुलीचा पाठलाग केल्याबद्दल आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याबद्दल ३० वर्षीय तरुणाला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश जयश्री आर. पुलाटे यांनी तरुणावर 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे की या गुन्ह्यात जास्तीत जास्त तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे, मात्र तो नेहमीचा गुन्हेगार नसल्यामुळे त्याला एक वर्षाची शिक्षा होऊ शकते. ही घटना 2015 मध्ये घडली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने टिळक नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?
2015 मध्ये ही घटना घडली तेव्हा अल्पवयीन मुलगी इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती. कोर्टासमोर जबाब देताना मुलीने सांगितले होते की, हा तरुण 17 एप्रिल २०१५ पूर्वी 15 दिवसांपासून तिचा पाठलाग करत होता. त्याने तिचे नाव विचारले होते आणि तिला ‘आय लव्ह यू’ म्हणाला होता. तिने त्यावेळी काहीही प्रतिसाद दिला नाही. परंतु,  दुसर्‍या दिवशी जेव्हा त्याने पुन्हा तिच्याशी संपर्क साधला, तेव्हा तिने त्याला एक पत्र दिले होते, ज्यात असे लिहिले होते की जर त्याने हे वागणे चालू ठेवले तर ती तिच्या पालकांकडे तक्रार करेल. त्यावर तो ‘सॉरी’ म्हणत निघून गेला.

तथापि, 17 एप्रिल 2015 रोजी, तिने सांगितले की जेव्हा ती घरी जात होती तेव्हा त्याने तिला रोखले होते. तिने आरडाओरडा केला आणि काही अंतर पुढे चालत असलेली तिची आई जवळ आली. त्यानंतर तिने तरुणाकडे बोट दाखवून तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली, त्यावेळी तो तरुण पळून गेला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली.

पीडितेने तरुणाशी बोलण्यात अनास्था दाखवली होती आणि तरीही आरोपी सतत तिचा पाठलाग करत होता, असे पुरावे रेकॉर्डवर असल्याचे न्यायाधीश पुलाटे यांनी आदेशात म्हटले आहे. तिच्या साक्षीवरून असे दिसून येते की, त्याचे पाठलाग करणे मुलीला आवडत नव्हते. ती तिच्या पालकांना सांगेल असे तिने सांगितले होते, परंतु आरोपीने तिचा पाठलाग सुरूच ठेवला, असे आदेशात म्हटले आहे. परंतु, हा नेहमीचा गुन्हेगार नसल्यामुळे न्यायालयाने त्याला एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत