Criminal Arrested For Killing Police Personnel Of Faraskhana Police Station In Pune

धक्कादायक : पुण्यात काही तासांत दोन हत्या, तडीपार गुंडानं केला सहाय्यक फौजदाराचा खून

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : एका तडीपार गुंडानं फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ आज रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपी प्रवीण महाजन याला एका वर्षापूर्वी तडीपार केले होते. सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय ४८) हे काम संपवून खडक पोलीस लाइनमधील राहत्या घरी जात असताना महाजन याने शहराच्या मध्यवस्तीमध्ये येत श्रीकृष्ण टॉकीज जवळ त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या खूनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाजन हा पोलिस रेकाॅर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर २० पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत त्याला दोनदा तडीपार केले आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीनं कारवाई करत महाजन याला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेची माहिती घेत असतानाच बुधवार पेठेत एका महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पुण्यात काही तासांच्या अंतरानं दोन खुनाच्या घटना समोर आल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत