Warning of heat wave to some districts of the state, appeal to the citizens to take care
महाराष्ट्र

उष्णतेची लाट तीव्र होणार! ‘या’ चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, काळजी घ्या…

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान हे चाळीसच्या वर गेले असून हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील चार शहरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने महाराष्ट्र आणि भारताच्या मध्य भागात ५ दिवस तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे. शक्यतो दुपारी घरी किंवा ऑफिसमध्येच राहा आणि अगदी आवश्यक असेल तरच प्रवास करा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुढील ५ दिवस विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातल्या चार जिल्ह्यांमध्ये आजपासून तापमान असेच वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत