मुंबई : राज्यातील नागरिकांना महागाईच्या जाचातून काहीसा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रतिलिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठक निर्णय
गुरूवार दि. १४ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात:– पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय.
( वित्त विभाग)– राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 14, 2022
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले कि, “महाराष्ट्रीयन आणि मराठी माणसांना मोठा दिलासा!
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रतिलिटरने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे.”
Great relief to Maharashtrian & Marathi Manus !
Happy to announce that new Government under CM Eknathrao Shinde has decided to reduce Petrol & Diesel prices by ₹5/litre & ₹3/litre respectively.#CabinetDecision #PetrolDieselPrice #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 14, 2022




