Nashik District Bank
नाशिक महाराष्ट्र

नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सहकार्य करेल – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणात सहकारी संस्थांची मातृसंस्था म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. प्राथमिक विविध कार्यकारी सहकारी संस्था, दुग्ध संस्था, खरेदी-विक्री संघ, नागरी बँका, नागरी पतसंस्था, सहकारी साखर कारखाने, शेतकरी व इतर सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या उभारणीत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.या बँकेचे योगदान मोठे राहिले आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात बँकेचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी हितासाठी बँकेच्या अडचणींवर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाचे सहकार्य असेल, असे सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील यांनी सांगितले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्रालयात नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार आयुक्त अनिल कवडे, ‘नाबार्ड’चे जनरल मॅनेजर रश्मी दरक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सहकार मंत्री वळसे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कामासाठी बँकेचे सहकार्य मोठे राहिले आहे. त्यामुळे बँकेच्या अडचणीवर सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. बँकेच्या अडचणींवर काय उपाययोजना करता येतील याबाबतचा सुधारित आराखडा महिन्याभरात शासनाकडे सादर करावा, असे निर्देश सहकार मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

वाढती थकबाकी, एनपीएत तोटा यामुळे सध्या नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे. बँकेच्या या अडचणी दूर करण्यासाठी ‘नाबार्ड’ने सुद्धा काय उपाययोजना करणे शक्य होईल, याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहनही सहकारमंत्री वळसे पाटील यांनी यावेळी केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत