चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. बल्लारशाह रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पुलाची उंची सुमारे 60 फूट असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताच्या वेळी त्यावर अनेक लोक उपस्थित होते. त्यामुळे हे लोक 60 फूट उंचीवरून रेल्वे रुळांवर पडले. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
आताच मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 20 जण जखमी झाले असून त्यातील 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, बल्लारशाह स्थानकावर अनेक प्रवासी काझीपेठ-पुणे एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी फलाट क्रमांक एकवरून फलाट क्रमांक चारवर जात असताना ही घटना घडली. अचानक पुलाच्या मधोमध असलेल्या स्लॅबचा काही भाग कोसळला, त्यामुळे तेथून जाणारे प्रवासी थेट खाली रुळांवर पडले.




