नागपूर

तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई करत नियम मोडणारांवर केली दंडात्मक कारवाई

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी रस्त्यावर उतरून धडक कारवाई केली. सेंट्रल एव्हेन्यू, मस्कासाथ, इतवारी, चितार ओळ या भागाचा आकस्मिक दौरा केला. आयुक्तांच्या निर्देशावरून अनेक ठिकाणी दुकानाचे फुटपाथवर ठेवलेले सामान अतिक्रमणविरोधी पथकाने जप्त केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यानंतर काही दुकानात स्वतः शिरून पाहणी केली. पाच पेक्षा अधिक ग्राहक असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली. चितार ओळ येथील मूर्तीकारांनीही तयार केलेल्या मूर्ती रस्त्यावर ठेवल्या होत्या. त्यांना समज देऊन दंडात्मक कारवाई केली. पाच आणि दहा हजारांचा दंड नियम तोडणाऱ्यांवर ठोठावला. या कारवाईनंतरही दुकानदार ऐकत नसतील तर दंडाची रक्कम २५ हजारांपर्यंत करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत