Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई

नवाब मलिक यांनी घेतली पत्रकार परिषद, ‘ते’ आरोप खरे असल्याचा दावा

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील वाद चिघळत चालला आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला शेअर केला होता. वानखेडे मुस्लिम असून बनावट जात प्रमाणपत्र बनवून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आता मलिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खरे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी जे काही प्रमाणपत्र दाखवले ते योग्य असल्याचे नवाब मलिक म्हणाले. ते खोटे वाटत असेल तर खरे प्रमाणपत्र दाखवावे, असेही ते म्हणाले. वानखेडे यांनी एका दलिताचे हक्क हिरावून घेतल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत