cabinet
महाराष्ट्र मुंबई

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 10 मोठे निर्णय, मुंबईकरांना मोठे गिफ्ट…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकरात आणखी एका वर्षाची सवलत, तसेच नगर विकास, नियोजन, महसूल व इतर विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय सामावले होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

1) अर्थ व सांख्यिकी संचालनालय पुनर्रचना

  • अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील 1,901 पदांच्या आकृतीबंधास मंजुरी.
  • संचालनालयाचे नाव बदलून अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यात येणार.
  • जिल्हा नियोजन समित्या, विभागीय आयुक्त कार्यालये, मानव विकास कार्यक्रम इत्यादींसाठी सुधारित अधिकारी-कर्मचारी आकृतीबंध निश्चित.

2) अटल सेतू पथकरात एक वर्ष सवलत

  • शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील टोल सवलत आणखी एक वर्ष वाढवण्यास मंजुरी.
  • वाहनधारकांना दिलासा.

3) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP-2)

  • सुधारित खर्चास मान्यता.
  • प्रकल्पातील सरकारचा आर्थिक हिस्सा उचलण्यास मंजुरी.

4) उलवे भूखंड शुल्क माफ

तिरुपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी देण्यात आलेल्या उलवे येथील भूखंडाचे शुल्क पूर्णपणे माफ.

5) पुणे ई-बस प्रकल्पाला मंजुरी

  • पीएम–ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी 1,000 ई-बस सेवेसाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मंजुरी.
  • डायरेक्ट डेबीट मॅन्डेटद्वारे संबंधित कंपन्यांना खर्चाची रक्कम दिली जाणार.

6) ठाण्यात मल्टी-मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट

  • ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथे भाजीपाला निर्यातीसाठी मल्टी-मॉडेल टर्मिनल मार्केट उभारणी.
  • राज्य कृषि पणन महामंडळाला 7 हेक्टर 96.80 आर जमीन उपलब्ध.
  • व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लांट रेडिएशन, पॅक हाऊस व साठवण सुविधा उभारणी.

7) यवतमाळ बेंबळा प्रकल्पास 4,775 कोटींची मंजुरी आणि धामक पुनर्वसन मार्गी

  • बेंबळा नदी प्रकल्पासाठी निधी मंजूर.
  • पाच तालुक्यांतील एकूण 52,423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.
  • अमरावती जिल्ह्यातील मौजा धामक पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी.

8) मुंबई पोलिसांसाठी 45,000 शासकीय घरे

मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी.

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी 45,000 निवासस्थाने उभारली जाणार.

9) परदेशी रोजगारासाठी ‘महिमा’ संस्था स्थापन

  • युवकांना परदेशातील रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतिशीलता आणि क्षमता संस्था (MAHIMA) स्थापन करण्यास मंजुरी.
  • जागतिक रोजगार संधींसाठी प्रभावी समन्वय आणि अंमलबजावणीसाठी संस्था कार्य करणार.

10) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथे भूखंड देण्यास मंजुरी, मुख्यालय आणि बहुउद्देशीय इमारत उभारणी शक्य.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत