cabinet
महाराष्ट्र मुंबई

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ 10 मोठे निर्णय, मुंबईकरांना मोठे गिफ्ट…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एकूण 10 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी–न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकरात आणखी एका वर्षाची सवलत, तसेच नगर विकास, नियोजन, महसूल व इतर विभागांशी संबंधित महत्वाचे निर्णय सामावले होते. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीस मंत्रिमंडळातील अनेक सदस्य […]

महाराष्ट्र मुंबई

राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार, तीन नवीन कार्यासने; गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय संपर्क, परदेशस्थ नागरिकांसाठी सुविधा

मुंबई : मान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यानुसार राजशिष्टाचार विभागात परकीय थेट गुंतवणूक, परदेशस्थ नागरिकांचे विषय आणि आंतरराष्ट्रीय संपर्क अशी तीन नवीन कार्यासने निर्माण करण्यासही मान्यता देण्यात आली. यामुळे गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि परदेशातील मराठी नागरिकांशी संपर्क वाढविणे शक्य होणार आहे. परकीय गुंतवणुकीला […]

महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थळ नियमांचे प्रारूप सहमतीसाठी केंद्राकडे पाठवणार

मुंबई : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात आले असून, यातील महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थळ संहिता नियम, २०२५ नियमांच्या प्रारूपास केंद्र सरकारच्या सहमतीसाठी पाठविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य आणि कार्यस्थळ संहिता नियम, २०२५ अंतर्गत […]

महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! पोलिस दलात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो तरुण-तरुणींची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपुष्टात आली आहे. राज्यातील पोलीस दलात तब्बल 15,000 नवीन भरती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज, मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी दिली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि वाढत्या कामकाजाला हातभार लावण्यासाठी ही मोठी भरती प्रक्रिया […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयकाचे प्रारूप मंजूर

मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयकाच्या प्रारूपास आणि ते विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्य़क्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ च्या विविध कलमांमध्ये आणि अनुसूची तीनमध्ये बदल केले आहेत. यासाठी वस्तू आणि सेवा कर […]