Bhatkhalkar tweeted and compared Uddhav Thackeray to Congress leader Rahul Gandhi

भाजप नेते अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र मुंबई राजकारण

मुंबई : मेट्रोच्या कामासाठी मालाड येथील कुरार परिसरातील घरांवर सकाळी कारवाई करण्यात आली. स्थानिक नागरिकांकडून या कारवाईला विरोध होत आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही या कारवाईला विरोध केला असून त्यांना वनराई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अतुल भातखळकर यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत म्हटलं कि, “कुरार परिसरातील नागरिकांना शुक्रवारी रात्री १२ वाजता नोटिस देण्यात आली आणि त्यानंतर आज सकाळी-सकाळी पोलीस बंदोबस्तात झोपड्यावर कारवाई करण्यात आली. लोकांना मारहाण करत घराबाहेर काढण्यात आलं. आम्ही याला विरोध केला. त्यामुळं आम्हाला ताब्यात घेतलं.

भातखळकर पुढे म्हणाले कि, “ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्घाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे एमएमआरडीएनं तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करुन आरे पोलिस ठाण्यात नेत आहे,’ असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. ‘मराठी माणसाचे नाव घेऊन पक्षाचे दुकान चालवायचे आणि ज्या मेट्रो प्रकल्पात अडचणींचे डोंगर उभे केले. त्या प्रकल्पातील एक स्थानकाच्या उद्घाटनासाठी लोकांना उध्वस्त करायचे. त्यांचे आहे तिथे पुनर्वसन का नाही? गिरगाव पॅटर्न का नाही?”

‘कुरारची कारवाई ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी आहे. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली. आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू,’ असा इशारा यावेळी भातखळकर यांनी दिला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत