अहमदनगर : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, आज माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु खबरदारी म्हणून मी स्वत: विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची कोव्हिड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे.काळजी करण्याचे कारण नाही परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे
माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी.
— Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) January 3, 2022
पंकजा मुंडेंना ओमायक्रॉनची लागण
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. पंकजा मुंडेंना एप्रिल 2020 मध्येदेखील कोरोनाची लागण झाली होती. यावेळी त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा रिपोर्ट रविवारी समोर आला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.




