Chief Minister's directive for positive action regarding railway cross bridge in Jaisingpur
कोल्हापूर महाराष्ट्र

जयसिंगपूरमधील रेल्वेक्रॉस पुलाबाबत सकारात्मक कार्यवाही करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथील रेल्वे क्रॉस पुलाबाबत परिसरातील रहिवासी क्षेत्र आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या पुलाबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली. बैठकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, परिवहन विभागाचे सह सचिव सिद्धार्थ खरात, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता अरोरा आदी सहभागी झाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आरओबी पूल उभारण्याचे प्रस्तावित आहे. वर्दळीचा मार्ग आणि आजूबाजूचे रहिवासी क्षेत्र यामुळे येथे सुरक्षेच्या दृष्टीने पूल व्हावा, अशी मागणी होती. त्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुलाबाबत स्थानिक रहिवाशांची सुरक्षितता, वाहनांची मोठी वर्दळ हे लक्षात घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत