Water release from Khadakwasla dam increased; Alert issued to citizens living along the river
पुणे महाराष्ट्र

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत असून खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग बुधवारी वाढविण्यात आला. सकाळी १० वाजता घेतलेल्या निर्णयानुसार सुरुवातीला ६,४५१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता, जो नंतर ८,५२२ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्वारगेट येथील मुठा कालवा सिंचन उपविभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी माहिती दिली की, हवामानातील बदल आणि पावसाची तीव्रता लक्षात घेऊन विसर्गाची मात्रा कमी अथवा अधिक केली जाऊ शकते. नागरिकांना, विशेषतः नदीकाठच्या रहिवाशांना, सतर्क राहण्याचे आणि नदीपात्राच्या जवळ जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात असून, आवश्यकतेनुसार पुढील सूचना व अद्ययावत माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत