मुंबई : प्रियकराने व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले, म्हणून 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यात कशावरून तरी वाद झाला आणि त्यानंतर मुलाने या मुलीचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक झाल्याने दुखी होऊन मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. प्रणाली लोकरे असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणालीच्या प्रियकराने तिचा नंबर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केला होता आणि याचा राग मनात धरून तरुणीने प्रियकराच्या घरी गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी प्रणालीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघे कोणाच्यातरी लग्नाला गेले होते आणि त्यानंतर मुलीने आपल्या प्रियकरासोबत त्याच्या घरी रात्रभर थांबण्याची इच्छा व्यक्त केली. अशा स्थितीत प्रियकराने तिची मागणी मान्य न करता तरुणीला घरी जाण्यास सांगितले.
या प्रकरणात, असे सांगितले जात आहे की यानंतर ती निघून गेली, परंतु काही वेळातच, मुलीने तिच्या प्रियकराला फोन करण्यास सुरुवात केली आणि पुन्हा सांगू लागली की तिला त्याच्या घरी यावे लागेल. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, मुलीच्या प्रियकराने तिला नकार दिला आणि नंतर व्हॉट्सअॅपवर तिचा नंबर ब्लॉक केला.
त्यानंतर तरुणीने रागाच्या भरात प्रियकराच्या घरी पोहोचून तिचा व्हॉट्सअॅपवर नंबर ब्लॉक करण्याबाबत जाब विचारला. या सर्व प्रकारानंतर तरुणी तिच्या प्रियकराच्या घरी राहिली, मात्र रात्री तिने ओढणीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी तिच्या प्रियकराला जाग आली तेव्हा तीला फासावर लटकलेली पाहून त्याला धक्का बसला. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अडचणी वाढल्या, आज आत्मसमर्पण न केल्यास पोलिस करणार कारवाई




