Eknath Khadse
महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

जळगाव : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली आहे. मंगळवारी ईडीने दिवसभर त्यांची चौकशी केली होती, त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरीमध्ये जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांची ईडीकडून  चौकशी करण्यात आली होती. ईडीने याप्रकरणी एकनाथ खडसेंची देखील चौकशी केली होती. त्यानंतर मंगळवारी गिरीश चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. ईडीने त्यांची 13 तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने गिरीश चौधरींना अटक केली.

भोसरी जमिन गैरव्यवहार प्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पद गमवावे लागले होते. यानंतर खडसेंची ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर काल त्यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. काल दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना अटक केल्याचे ईडीने जाहीर केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत