Health Minister Prof. Dr. Tanaji Sawant
अमरावती महाराष्ट्र मुंबई

आदिवासींच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत

मुंबई : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या सर्व योजना कालबद्ध पद्धतीने प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याबाबत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रा. सावंत बोलत होते. यावेळी या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, देवराव होळी, सुलभा खोडके, आशिष जयस्वाल, राजेंद्र शिंगणे यांनी भाग घेतला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्यमंत्री प्रा. सावंत म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी पट्ट्यामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या बळकटीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेवून या भागातील बालविवाह रोखणे, यासह अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतील. तसेच गर्भवती स्त्रियांसाठी तीन वर्षाचा कार्यक्रम राबवावा यासाठी सर्वांची मते विचारात घेऊन योजना राबविण्यात येणार आहे. लसीकरण, पदभरती, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पदेदेखील पूर्ण क्षमतेने भरण्यात येतील.

महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, कुपोषणमुक्तीसाठी महिला व बालविकास विभाग आदिवासी विकास विभागाच्या समन्वयाने विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत