The results of class XII will be announced today at 1 pm
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

बारावीचा यंदाचा निकाल 91.88%, मुलींनी मारली बाजी, निकाल SMS ने देखील पाहता येणार…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा यंदाचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात १.४९ टक्क्यांची घट झाली आहे. २०२४ मध्ये निकाल ९३.३७% इतका लागला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांची ८९.५१ टक्के आहे. याचा अर्थ, मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी अधिक आहे.

कोकण विभाग अव्वल, लातूर सर्वात मागे
राज्यातील कोकण विभागाने सर्वाधिक ९६.७४ टक्के निकाल मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के आहे. इतर विभागांमध्ये पुणे, नागपूर, मुंबई, संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक हे आहेत.

राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १४ लाख ८७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण उत्तीर्णतेचा टक्का ९१.८६ आहे.

निकाल पाहण्याची पद्धत
ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे:

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

mahahsscboard.in

डिजीलॉकरवरून मार्कशीट कशी डाउनलोड कराल?

१. https://www.digilocker.gov.in या वेबसाईटवर जा.
२. मोबाईल क्रमांक टाका आणि ‘Continue’ वर क्लिक करा.
३. मोबाईलवर आलेला OTP टाका आणि ‘Verify’ करा.
४. लॉगिन केल्यावर ‘Profile’ पेजवर जाऊन आधार क्रमांक टाका व Sync करा.
५. ‘Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education’ निवडा.
६. नंतर ‘Marksheet’ निवडून वर्ष, रोल नंबर भरून ‘Get Document’ वर क्लिक करा.
७. तुमची डिजिटल मार्कशीट डाउनलोड होईल.

SMS ने निकाल पाहण्यासाठी:

SMS फॉर्मॅट: MHSSC <Seat Number>

पाठवायचा क्रमांक: 57766

काही क्षणांतच तुमचा निकाल एसएमएसने मिळेल.

विद्यार्थ्यांनी आपल्या मार्कशीटची साक्षांकित छायाप्रत भविष्यातील प्रवेशासाठी जपून ठेवावी. जर काही त्रुटी आढळल्या, तर लवकरात लवकर शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत