मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज ‘चक्का जाम’ आंदोलन पुकारलं आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी या ‘चक्काजाम’ला पाठिंबा दिला आहे. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ‘काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय का? असा बोचरा सवाल शेलार यांनी केला आहे.
अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्वीट केलं होतं. त्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्यासह भारतीय सेलिब्रिटींनी त्यांना उत्तर दिलं. त्यावरून शिवसेनेनं भारतातील सेलिब्रिटींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. रिहाना, थनबर्गच्या ट्वीटला उत्तर देणाऱ्या सेलिब्रिटींना भाजपनं लक्झरी गाडीत बसवून गाझीपूर, सिंघू बॉर्डरला नेलं पाहिजे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. शेलार यांनी याच मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेना ‘पॉप डान्स’ करतेय. या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात. ‘वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय?, काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर “ट्रॅक्टर” फिरवणार का?
देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने “पॉप डान्स” केला.
तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात.
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 6, 2021
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय?
काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा “चक्काजाम” झालाय ?
सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर “ट्रॅक्टर” फिरवणार का?
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 6, 2021




