मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.
दरम्यान, विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात आल्याची माहिती दिली. त्यावर वळसे-पाटील म्हणाले की, फोन टॅपिंग हे प्रकरण गंभीर असून याबाबत सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करुन याबाबतचा अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करण्यात येईल असे नमूद केले.




