मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री […]
टॅग: Home Minister Dilip Walse-Patil
सिंगापूरच्या नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट
मुंबई : सिंगापूर गणराज्याचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची आज मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र पोलिसांना पोलिसिंगसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहु, असे वाणिज्यदूत चेओंग मिंग फूंग यांनी गृहमंत्र्यांना यावेळी सांगितले. सायबर क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हे सर्वांसाठी मोठे आव्हान आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस […]
आमच्या पोलिसांचा मला अभिमान, गृहमंत्र्यांनी केले गडचिरोली पोलीस दलाचे कौतुक
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा केली आहे. “आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,” अशा शब्दांत गृहमंत्र्यांनी पोलिसांचे कौतुक केले. आजची कारवाई ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे. या कारवाईत २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी […]
एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत सर्वतोपरी सहकार्य – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या चित्रपटगृह परवाना अहस्तांतरणीय आहे. हा परवाना हस्तांतरणीय व व्यापारक्षम करण्यात यावा तसेच ही प्रक्रिया सुलभ करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले. एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव […]
चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील वाढलेली गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी गृह विभागाने कठोर पाऊल उचलले असून यापुढे अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. मंत्रालयातील समिती सभागृहात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कला दिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येसंदर्भात व […]
भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली. दरम्यान, विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी आज […]



